प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यासाठी स्वतंत्र आवृत्ती प्रकाशित करणाऱया ‘तरुण भारत’च्या गडहिंग्लज कार्यालयाचा वर्धापनदिनानिमित्त आज शनिवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेपर्यंत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या स्नेहमेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर आणि कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांनी केले आहे. वर्धापनदिनानिमित्त प्रकाशीत होणाऱया ‘आनंदी जीवन’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
कोल्हापूर जिल्हय़ात जिल्हय़ाच्या ठिकाणापासून दूर असणाऱया गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यातील विविध समस्या, सामाजिक प्रश्न शासन दरबारी पोचविण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी ‘तरुण भारत’ ने गडहिंग्लज, आजरा, चंदगड या विभागासाठी स्वतंत्र आवृत्ती सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद या तीन तालुक्यातील वाचकांकडून मिळत आहे. ‘तरुण भारत’च्या गडहिंग्लज कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त 24 पानी ‘आनंदी जीवन’ ही भरगच्च विशेषांक वाचकांसाठी ‘तरुण भारत’ च्या अंकासोबत दिला जाणार आहे. या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्षा शंकुतला हातरोटे, पंचायत समिती सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर विशेषांक शनिवारच्या अंकासोबत मोफत देण्यात येणार आहे. वर्धापनदिनानिमित्त सायंकाळी ‘तरुण भारत’च्या नगरपालिका शॉपींग सेंटर, भडगाव रोड, गडहिंग्लज येथे या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या स्नेहमेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नामवंत लेखकांचे दर्जेदार लेखगुरूजी हाच आनंददायी शिक्षणाचा आत्मा (प्रा. आशपाक मकानदार), स्वानंद यात्री (योगशिक्षक राम पाटील), संतवाणीतील आंनद विचार (प्रा. शिवाजीराव भुकेले), वर्तमानात सामावले जीवन (डिंपल गजवणी), भोजन एक जीवनरस (डॉ. अनिल वैद्य), आत्मशांती आणि आंनदी जीवन (सुनेदा बेहनजी), सकारात्मक जीवनाचा रंगानुभव (विजय टिपूगडे), आनंदी जीवन जगण्यासाठी जीवन विद्येचा उपयोग काय.. (हिंदूराव पाटील), आनंदी जीवन जगणे एक कला (राम पाटील), तरच सापडेल दीर्घायुष्याची गुरूकिल्ली, इच्छाशक्तीच बनवते यशस्वी, कृष्णार्पण, (शर्मिष्ठा ताशी), पॉझिटिव्ह (सागर वातकर), आनंदाचा संसार (डॉ. वासुदेव देशिगंकर) आदी लेखकांचे दर्जेदार लेख पुरवणीत आहेत. |