जि.प सदस्य अरूण कदम यांचा इशारा, संयमाचाअंत न पाहण्याची तंबी
प्रतिनिधी / खेड
कुणाच्या तरी सांगण्यावरून जिओ व रिलायन्स कंपनी काम थांबवून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणार असेल तर शिवसेना हे कदापीही सहन करपार नाही. या कंपन्यांनी विनाविलंब काम सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा शारा जि.प. सदस्य अरूण कदम यांनी रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत दिला.जिओच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आम्ही दाद कोणाकडे मागायचीत अशी व्यथा आमदार योगेश कदम यांच्याकडे मांडण्यात आली. दापोली विधानसभा मतदार संघात काम करणाऱ्या जिओ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. यापुढे जनतेच्या भावनांशी कोणालाही खेळू देणार नाही.
या कंपन्यांविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. उद्रेक झाल्यास विनासेवा असलेले टॉवर काढून टाकले जातील, अशी तंबीही दिली आहे.आमदार योगेश कदम यांनी चर्चेदरम्यान जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा सक्षम आहे. दापोली मतदार संघातील नागरिक निश्चितच सहकार्य करतील. वेळप्रसंगी जनतेला चांगली सेवा मिळावी, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सेनेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण मदत करून सर्वोतोपरी सहकार्य करतील. यासाठी कामे त्वरीत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देत कामे सुरू करण्यास कुचराई केल्यास शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असेही स्पष्ट केले.