तामिळनाडूच्या जिल्हा रुग्णालयाचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. विल्लुपुरम जिल्हा रुग्णालयातून 4 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी यातील 3 रुग्णांना शोधून काढले असले तरीही चौथा रुग्ण अद्याप बेपत्ता आहे. रुग्णालयाकडून पॉझिटिव्ह रुग्णांना एका निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र सोपवून सोडून देण्यात आले होते.
प्रत्यक्षात त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले होते. पोलिसांनी 3 रुग्णांना शोधून काढत त्यांना इतरांपासून वेगळे करण्यास यश मिळविले आहे. चौथा रुग्ण शोधण्यासाठी 5 विशेष पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांनी दिली आहे.
तामिळनाडूत तबलिग जमातच्या मरकजमुळे कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्य प्रशासनाने वेळीच उपाययोजना करत स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. या उपाययोजनांना काही प्रमाणात यश देखील मिळू लागले आहे.