ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूत ऐन विधानसभा निवडणुकीतच सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपच्या आघाडीला अभिनेते विजयकांत यांच्या DMDK पक्षाने दणका दिला. निवडणुकीत मागणीनुसार जागा आणि मतदारसंघ न दिल्याने नाराज असलेला DMDK पक्ष या आघाडीतून बाहेर पडला.
तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागांसाठी 6 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकने जागा वाटपासाठी DMDK ला दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर DMDK ने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेतला. 2019 ची लोकसभा निवडणूक DMDK ने आघाडीच्या साथीने लढली होती.