सांबरा/ वार्ताहर
तालुक्मयाच्या पूर्व भागात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयजयकारात तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात शुक्रवारी गणपती बाप्पाचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले.
पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, बसरीकट्टी, शिंदोळी, मावीनकट्टी, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी आदी गावांमध्ये सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यात येत होते. दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने तसेच पायी चालत गणेशभक्त गणरायाला घेऊन येत होते. यावेळी फटाक्मयांची आतषबाजी करत गणपतीचा जयजयकारही करण्यात येत होता. दुपारपर्यंत घरगुती गणपती घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
दुपारनंतर सार्वजनिक गणपती आणण्याची लगबग सुरू झाली. ट्रक्टर, ट्रक, टेम्पो आदी वाहनांतून सार्वजनिक गणपती आणण्यात येत होते. पारंपरिक वाद्य, धनगर वाद्य व झांज पथक आदींच्या गजरामध्ये सार्वजनिक गणपतींचे आगमन होत होते. गणपतीच्या आगमनावेळी अधून-मधून पावसाच्या सरीही हजेरी लावत होत्या. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता.