वार्ताहर / किणये
तालुक्मयात मंगळवारी हनुमान जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. विविध गावातील हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. येणाऱया भक्तांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत होते. तसेच सॉनिटाझरचा वापर करण्यात येत होता.
तालुक्मयाच्या बहुतांशी गावात मारुतीची मंदिरे आहेत. हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी बऱयाच गावांमध्ये पवनपूत्र हनुमंताची विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. काही ठिकाणी अभिषेकचा कार्यक्रम झाला. महाआरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
संकटमोचक हनुमंताकडून कोरोनाचे संकट लवकर दूर कर, अशी मागणी भक्तांनी केली. बहाद्दरवाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सकाळी महाआरती करून पाळणा गीत म्हणण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सावगाव येथील शिवस्मारक सेवा समिती, शिवप्रति÷ान ंिहंदुस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव व छत्रपती श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी गावातील मारुती मंदिर येथे काकड आरती करण्यात आली. गावातील वारकऱयांनी काकडारती म्हटली. त्यानंतर मारुतीरायाची पूजा करण्यात आली. सर्वांनी पुष्पवृष्टी अर्पण करून हनुमान जन्मोत्सव साजरा केला. यावेळी पवनपूत्र हनुमान की जय, बजरंगबली की जय, असा जयघोष कार्यकर्त्यांनी केला. सावगाव गावात उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. या शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ मूर्ती उभारण्यात आली आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गावातील पंच, नागरिक व शिवभक्त उपस्थित होते.
मंडोळी येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. वारकरी मंडळींनी काकड आरती म्हटल्यानंतर हनुमान जन्मोत्सव साजरा केला. किणये येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रारंभी ग्राम पंचायत सदस्य श्रीधर यांच्या हस्ते हनुमान मूर्ती पूजन करण्यात आले. त्यानंतर हनुमान स्तोत्र व आरती झाली. उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये रात्री भजनाचे कार्यक्रम झाले. कोरोनामुळे यंदाची हनुमान जयंती भक्तांनी साध्या पद्धतीने साजरी केली.