प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. सोमवारी एकाच दिवशी 47जणांना कोरोना ची बाधा झाली आहे. यामध्ये तालुक्यात सर्वाधिक कुमठे येथील 22 जणांचा समावेश आहे.तर तासगाव येथे 10 रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात अंजनी-2,चिंचणी-2,नागाव नि.-2,येळावी-3,तसेच आरवडे, ढवळी, डोंगरसोनी, गव्हाण, सावळज, तुरची येथे प्रत्येकी एक असे एकूण 47 रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात आत्तापर्यंत 126 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1312 झाली आहे. सोमवारी 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 751 जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या तालुक्यात गृह विलगीकरणात ठेवलेल्यांची संख्या 341 आहे. आत्तापर्यंत मृत्यूची संख्या 82 झाली आहे. सोमवारी एकूण 125 जणांची तपासणी करण्यात आली.