ऑनलाईन टीम / तिरुपती :
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध देवस्थान तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भक्तांना आजपासून लाडूचा प्रसाद मोफत स्वरुपात देण्यात येणार आहे. या मंदीरात नेहमीच मोठी गर्दी असते, तर सणा आणि शुभदिवसाच्या मुहुर्तावर लाखो भाविक दर्शनासाठी मोठी रांग लावतात.
टीटीडीचे अतिरिक्त ईओ इवी धर्मा रेड्डी म्हणाले, आता कोणीही व्हीआयपी असो की गरीब भाविक सर्वांना एक लाडू मोफत दिला जाणार आहे. देवाच्या मंदिरात सर्व भाविक एकसमान असतात. दर्शन घेतल्यानंतर भाविकाला तिरूपती लाडू मोफत दिला जाणार आहे.
दरम्यान, मंदिर समितीकडून सद्यस्थितीला एका दिवसात 20 हजार लाडूंचा प्रसाद देण्यात येतो. यापूर्वी पायी येणाऱया भक्तांसाठी 175 ग्रॅमचा लाडू तर इतर भक्तांसाठी 40 ग्रॅमचा लाडू देण्यात येत होता. आता, नवीन नियमावलीनुसार 175 ग्रॅमचे 80 हजार लाडू भक्तांसाठी प्रसाद म्हणून मोफत वाटण्यात येणार आहेत. मात्र, जर एखाद्या भक्ताने अतिरिक्त लाडूचा मागणी केल्यास, त्यास एका लाडूसाठी 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.