वाढत्या डिस्चार्जने लढय़ाला उमेद चोवीस तासात 34 मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला आहे. यात सर्वाधिक बाधित 321 सातारा तालुक्यात असून यात शहर व परिसरात 221 जण बाधित आहेत. कराड, वाई, फलटण तालुक्यासह एकूण सात तालुक्यांमध्ये शंभरावर रूग्णांची नोंद झाली आहे. मृत्युतील वाढ कायम असून 10 मृत्यू सातारा शहर व तालुक्यात झाले आहेत. शुक्रवारी 1670 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या तीन दिवसांत डिस्चार्ज वाढला असून 4204 जण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे.
हॉटस्पॉट साताऱयातील वाढ थांबेना
गुरूवारी रात्रीचा अहवाल शुक्रवारी आला. यात कालच्या पेक्षा किंचिंत कमी वाढ झाल्याचे दिसत आहे. 1742 जण बाधित आहे. आकडा कमी असला तरी पॉझिटिव्हीटी रेट 35.6 टक्के इतका झाला आहे. सर्वाधिक रूग्ण सातारा शहर व तालुक्यात 321 इतकी झाली आहे. यात शहर व परिसरातील 221 रूग्ण आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून साताऱयात सर्वाधिक वाढ होत असून येथे निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. हे शहर दक्षिण महाराष्ट्रात हॉटस्पॉट झाले आहे.
सात तालुक्यात शंभरपेक्षा जास्त
सर्व तालुक्यात संसर्ग वाढत आहे. गेले वर्षभर पाटण तालुक्यात वाढ कमी प्रमाणात होती. गुरूवारच्या अहवलात प्रथमच पाटणला 101 रूग्णांची नोंद झाली आहे. सातारा 321, कराड 180, फलटण 142, खटाव 107, माण 204, कोरोगाव 63, खंडाळा 97, वाई 131, महाबळेश्वर 53, जावली 87 याप्रमाणे रूग्णवाढ झाली आहे.
छोटय़ा शहरांतही वाढताहेत रूग्ण
या अहवालात लहान शहरेही हॉट स्पॉट होत असल्याचे दिसत आहे. कोडोली 21,तारळे 29, म्हसवड 66, नरवणे 22, दहिवडी 33, लोणंद 19, शिरवळ 39, बावधन 19, खर्शी 21 या गावांमध्ये जास्त रुग्ण नोंद झाले आहेत.
चोवीस तासात 34 बाधितांचा मृत्यू
मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. चोवीस तासात 34 मृत्यूची नेंद झाली आहे. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील 60 वर्षीय महिला, अतित (ता. सातारा) येथील 72 वर्षीय महिला, पिंपोडे (ता. सातारा) येथील 50 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सातारा येथील 55 वर्षीय महिला, महागाव (ता. सातारा) येथील 81 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 85 वर्षीय महिला, केसरकर पेठ, (सातारा) येथील 63 वर्षीय पुरुष, तडवळे (ता. कोरेगाव) येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील 73 वर्षीय महिला, गजवडी (ता. सातारा) येथील 50 वर्षीय महिला, मुंबई येथील 58 वर्षीय महिला, सोळशी (ता. कोरेगाव) येथील 31 वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील 40 वर्षीय महिला, सायगाव (ता. जावली) येथील 79 वर्षीय पुरुष, फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, खबालवाडी (ता. खटाव) येथील 47 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर (ता. सातारा) येथील 55 वर्षीय पुरुष, बोपेगाव (ता. वाई) येथील 65 वर्षीय पुरुष, तोंडोली (ता. कडेगाव) येथील 60 वर्षीय महिला, कराड येथील 52 वर्षीय महिला, पोतेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) येथील 72 वर्षीय महिला, कार्वे नाका, कराड येथील 47 वर्षीय पुरुष, केसकर पेठ (सातारा) येथील 67 वर्षीय पुरुष, वरुड (ता. खटाव) येथील 76 वर्षीय पुरुष, वडी (ता. खटाव) येथील 60 वर्षीय पुरुष, बरड (ता. फलटण) येथील 53 वर्षीय महिला, तांबवे लोणंद (ता. खंडाळा) येथील 27 वर्षीय पुरुष, बिदाल (ता माण) येथील 70 वर्षीय महिला, काण्हरवाडी (ता. खटाव) येथील 49 वर्षीय पुरुष, येराळवाडी (ता. सातारा) येथील 75 वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 60 वर्षीय महिला, वाई येथील 11 वर्षीय युवक अशा एकूण 34 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1670 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1670 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी 860, गुरूवारी 1674 व आज 1670 असा 4204 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रेमडिसीवर इंजेक्शनच्या साठय़ाची वितरण आदेशानुसारच विक्री करावी
जिह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात रेमिडिसीवर इंजेक्शनची टंचाई भासत असून, रुग्णालयांमध्ये रेमिडिसीवर इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनचा साठा, मागणी विचारात घेता विविध पातळीवर उपाययोजनेसह तरतूद करणे अत्यंत आवश्यकता आहे.
सातारा जिह्यातील सीसीसी, डीसीएचसी, खाजगी हॉस्पिटल्स आणि होलसेल व रिटेल मेडिकल वितरक-डिस्ट्रीब्युटर्स यांनी त्यांना प्राप्त झालेल्या रेमिडिसीवर इंजेक्शनच्या साठय़ाची अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या वितरण आदेशानुसारच विक्री व वितरण करावे. परवानगीखेरीज कोणतेही परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी कळविले आहे. अन्यथा निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल लायसेन्स – परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही कळविले आहे.
शुक्रवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 1742
एकूण मुक्त 1670
एकूण बळी 34