नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) चोरी करणाऱया काही संस्थांवर जीएसटी महानिर्देशनालय यांच्याकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास तीन संस्थांनी 600 कोटी रुपयांची जीएसटी चोरी केल्याचा आरोप या संस्थांवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार मेसर्स फॉर्च्यून ग्राफिक्स लिमिटेड, मेसर्स रीमा पॉलीकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स गणपत्ती एन्टरप्राईजेस यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही संस्थांशी संबंधीत असणाऱया या प्रकरणात वास्तविक मालाऐवजी अन्य माहिती देणे, पुरवठा आणि अन्य संदर्भात खोटी बिले सादर करणे आदी गोष्टींमुळे ही कारवाई केल्याची माहिती जीएसटी विभागाने दिली आहे.