बेळगाव /प्रतिनिधी
तुकाराम को-ऑपरेटिव्ह बॅंकेची 69 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि. 20 रोजी आयोजित करण्यात आली आहे. खानापूर रोड येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरीएन्टल शाळेच्या सभागृहात आयोजित केली जाणार आहे. मात्र यंदा रिर्झव्ह बॅंकेच्या आदेशानुसार बॅंकेच्या सभासदांना लांभाश देण्यात येणार नाहे. तसेच तुकाराम बँकेने प्रगती साधली असून गेल्या सहा महिन्यातील कोरोना काळात देखील बँकेत ठेवी वाढल्या असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी शुक्रवारी बॅंकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बॅंकेने कोरोना काळात चांगले सहकार्य केले असून बँकेने पहिल्यांदा 50 सिलिंडरचे वाटप केले आहे. याबरोबराच आत्पकालीन परिस्थितीत 50 सिलिंडर राखीव ठेवले आहेत. सर्वसामान्यांना वेळेत कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात असून यंदा बॅंकेला 47 लाख 62 हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. तर सभासद संख्या 9052 वर पोहोचली आहे. खेळते भाग भांडवल 58 कोटी 25 लाख 81 हजार 181 इतके आहे. तर 47,47,78, 338 इतक्मया ठेवी आहेत. बँक सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. को-आपेटिव्ह बॅकांना रिझर्व्ह बॅंकेच्या अधिपात्याखाली काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार यंदा लांभाश देता येणार नसल्याची माहिती देखील मरगाळे यांनी दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी संचालक नारायण पाटील, अनंत जांगळे, प्रविण जाधव, वंदना धामणेकर, संजय बाळेकुंद्री, राजू मरवे आदी उपस्थित होते.