मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन
वार्ताहर / उचगाव
तुरमुरी येथील जनता कॉलनीमध्ये गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करून उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजुकर होते.
यावेळी मंदिराचे उद्घाटन मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना पूजन बाळू अष्टेकर यांच्या हस्ते, मंगलकलश पूजन ग्रा. पं. अध्यक्षा वैशाली खांडेकर, कळसारोहण परमपूज्य चित्प्रकाशानंदजी सरस्वती स्वामीजी आर्ष विद्या केंद्र टिळकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विवेक गिरी व नामदेव तुप्पट यांनी केले. चौकट पूजन अशोक जाधव, घंटा पूजन विजय उदडगी, दत्त फोटो पूजन संदीप जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन चांगदेव बेळगावकर, ज्ञानेश्वर फोटो पूजन सिद्धाप्पा कांबळे, दीपप्रज्वलन ग्रा. पं. माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, नारायण जाधव, युवराज नाईक, वैजनाथ गोजगेकर, राजू बांडगे, यल्लाप्पा कलंभट, अर्जुन कलंभट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कविता देवरमनी, शोभा सनदी, लक्ष्मी सुतार, महेंद्र जाधव, सुरेश डोंबले, शंकर कांबळे, संजय नाईक, तुकाराम तुप्पट, अशोक बांडगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चलवेटकर यांनी केले. आभार नामदेव तुप्पट यांनी मानले.