राज्यसभेत पुन्हा गोंधळ – नियमपुस्तिका फेकल्याने झाली कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्यसभेत निवडणूक सुधारणा कायदा विधेयक मंगळवारी सादर करण्यात आले. या विधेयकाला विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी नियमपुस्तिका (रुलबुक) फेकली आहे. संसदेच्या मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी ओ ब्रायन यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे.
विधेयकावरील चर्चेदरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक यांनी विधेयक संमत करविण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदविला. संतापलेले ओ ब्रायन यांनी संसदेची नियमपुस्तिका सभापतींच्या आसनाच्या दिशेने फेकल्यावर सभात्याग केला होता. ओ ब्रायन यांच्या कृतीनंतर सभागृहात जोरदार गोंधळ झाला. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी खासदाराच्या वर्तनावर टीका केली. त्यांनी नियम 258 चा दाखला देत सेक्रेटरी जनरलवर नियमपुस्तिका फेकण्याची कृती आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. तर सभागृहाचे नेते पियूष गोयल यांनी ओ ब्रायन यांच्या कृतीवर आक्षेप नोंदविला आहे. यानंतर संसदेच्या मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी ओ ब्रायन यांनी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी सभागृहात मतदान घेण्यात आले होते.