राज्यात आणि देशात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचबरोबर शेअर बाजारातही तेजीचाच कल दिसून येत आहे. सलग पाचव्या आठवडय़ात शेअर बाजारात तेजी दर्शवली गेली. कोविडवरची लस येण्याची शक्मयता आणि त्याला मिळालेली चालना यामुळे शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्सने 37 हजारांचा टप्पा पार केला आहे तर निफ्टीने 10,901चा टप्पा गाठला आहे. आता या आठवडय़ात शेअर बाजारांची चाल कशी असेल याचा घेतलेला आढावा…
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सलग पाचव्या आठवडय़ातही तेजी दर्शवली आणि 1.2 टक्क्मयांनी त्याच्यात गेल्या आठवडय़ात वाढ झाली. अर्थात बँक निफ्टीला मात्र आपला चढता आलेख राखता आला नाही. चार आठवडय़ात चांगली तेजी दर्शवलेला बँक निफ्टी गेल्या आठवडय़ात 1.9 टक्क्मयांनी घसरला. बीएसई मिडकॅपमध्येही एक टक्क्याची वाढ झाली. पण स्मॉलकॅप 0.17 टक्क्याने खाली आला.
वेगवेगळय़ा क्षेत्रांचा विचार केला तर तंत्रज्ञान, एफएमसजी, फार्मा आणि एनर्जी स्टॉक्सनी शेअर बाजारांची कमान चढती ठेवली. तर बँकींग, फायनान्स, रियल्टी आणि टेलिकॉम, पॉवर स्टॉक्सची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली. आजपासून सुरू होणाऱया आठवडय़ात कोणतीही मोठी घटना घडण्याचा अंदाज, शक्मयता नाही. विविध कंपन्यांचे जूनअखेरचे परिणाम आणि जागतिक घडामोडी यांचाच या आठवडय़ात शेअर बाजारांच्या व्यवहारांवर प्रभाव असेल.
दुसरे म्हणजे लॉकडाऊनच्या या काळात आपले व्यवसाय टिकवण्यासाठी वेगवेगळय़ा कंपन्या चांगलेच प्रयत्न करणार हेही उघड आहे. भांडवल उभे करण्यासाठी एफपीओ, क्मयूआयपी, आयपीओ आणि इतर प्रणालींचा आधार या कंपन्या घेतीलच घेतील. त्यामुळे येणाऱया आठवडय़ांमध्ये बाजारात या सगळय़ांची भरमार दिसेल. येस बँकेपासून ऍक्सीस बँक, आयसीआयसीआय बँक ते स्टेट बँकेपर्यंत सगळय़ा बँकाही भांडवल उभारणीसाठी वेगाने प्रयत्न करताना दिसतील.
कोविडमुळे सगळी अर्थव्यवस्थाच ठप्प झाली असताना बँकांकडून अपेक्षा केल्या जात आहेत आणि बँकांनी आपले भांडवल वाढवावे असा स्पष्ट संकेत रिझर्व्ह बँकेनेही बँकांना दिला आहे. पण बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी कुणाची फारशी तयारी दिसत नाही. सध्या कोणत्याच क्षेत्रात मागणी दिसून येत नाही. पण मध्यम आणि लहान उद्योगांना सरकारच्या मदतीमुळे आशादायी वातावरण आहे.
गेल्या आठवडय़ात इन्फोसिस, विप्रो यासारख्या आयटी कंपन्यांत मोठय़ा प्रमाणात खरेदी दिसून आली. हा टेंड या आठवडय़ातही सुरू राहील. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही या कंपन्यांची चांगली वाढ झाली आहे. या कंपन्यांचे परिणाम त्यांच्यावरील विश्वास वाढवणारे आहेत.
बँक निफ्टीत मात्र मंदीचा कल दर्शवला जाण्याची शक्मयता आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होईल त्यातही जर पुन्हा लॉकडाऊनची कुऱहाड कोसळली तर शेअर बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र एकूण विचार केला तर शेअर बाजारातील तेजीचा कल टिकून राहील असेच चित्र आहे. एक तर कोणतीही विशेष घटना घडण्याचे चिन्ह नाही आणि पावसाला दमदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे बाजार तेजीच दर्शवतील अशीच शक्मयता आहे. या आठवडय़ात आयटी आणि फार्मा कंपन्यांवरच लक्ष केंद्रीत करणे इष्ट ठरेल. लॉकडाऊनमुळे लोकांचे आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणावर होत आहे. यावर काही ना काही वेगळा पर्याय काढण्याची आवश्यकता आहे. या आठवडय़ात अल्पकाळासाठी एचडीएसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाईफ इन्शुरन्स, व्होल्टास या कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी करायला हरकत नाही. एचडीएफसी बँकेचे पहिल्या तिमाहीचे परिणाम जाहीर झाले आहेत. वीस टक्क्मयांचा नफा त्यात दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे या बँकेच्या शेअर्सवर अनेकांचे लक्ष असणार आहे.
फार्मा कंपन्याही आकर्षण ठरणार आहेत. ल्युपिन, अजंता फार्मा या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत. पिरामल एंटरप्रायजेसही खरेदी करायला हरकत नाही. आयटी आणि फार्मा कंपन्यांमुळे बाजारात तेजीचा कल राहील तर बँक निफ्टी मंदीचा कल दर्शवत आहे. याही आठवडय़ात सावधानपणेच टेडींग करणे इष्ट ठरेल. कोविडवरची लस ही सर्वात मोठी घटना असेल आणि ती जेव्हा घडेल तेव्हा सगळी अनिश्चितता संपुष्टात येईल. शेअर बाजारातही तेजीचा कल दिसतो आहे तो या लसीच्या अपेक्षेनेच. सध्या शेअर्सचे भाव वधारत असले तरी गुंतवणूकदारांना अजूनही परवडतील असे आहेत त्यामुळे गुंतवणूकदार उत्साहाने खरेदी करत आहेत. सर्व काही ठीक होईल या अपेक्षेनेच शेअर बाजाराची वाटचाल सुरू आहे.
– संदीप पाटील