आज सर्वत्र लक्ष्मीपूजनाची धूम : विविध साहित्यांनी बाजारपेठ बहरली
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राहकाला जे हवे ते बाजारपेठेत उपलब्ध व्हावे, या धारणेतून व्यापारी, दुकानदार लहान-सहान विपेत्यांनी बाजारपेठेत दिवाळीचे औचित्य साधून मिठापासून पिठापर्यंत व पीन टू पियानोपर्यंत साहित्य दाखल केले आहे. कोरोनाच्या काळय़ाकुट्ट अंधाराला छेदून यंदाची दिवाळी तेजोमय होत असल्याने शहरवासियांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा या उत्साहाच्या आनंदाच्या भरात दिवाळीची खरेदी विशेषत्वाने होईल, याचा अंदाज असलेल्या व्यापाऱयांनी साहित्याची रेलचेल केली आहे.
यामुळेच घरगुती सजावटीच्या वस्तू असोत, धनधान्य असो, फराळ असो, भेटवस्तू असो किंवा गरजेच्या वस्तू असोत, शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह सर्व परिसर विपेते आणि ग्राहक यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
गणपत गल्ली, बुरूड गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक या मध्यवर्ती भागांसह टिळकवाडी, अनगोळ, वडगाव, शहापूर यासह उपनगरांतही हेच चित्र दिसत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दीला ऊत आला आहे. सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गुरुवारी नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन असल्याने त्यासाठी लागणाऱया साहित्याच्या खरेदीसाठी सकाळपासूनच बेळगावसह ग्रामीण भागातील नागरिकही दाखल झाले होते. नरकचतुर्दशीसाठी लागणारी कारीटे, कडुवेल हे साहित्य घेऊन ग्रामीण भागातील विपेते रस्तोरस्ती बसलेले दिसत होते. अभ्यंगस्नानासाठी उटणे, साबण, सुवासिक तेल यांचे स्टॉलही ठिकठिकाणी लागले आहेत.
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या झेंडुच्या फुलांच्या राशी व कोहाळे बाजारपेठेत सर्वत्र पहायला मिळत आहेत. केशरी, पिवळा झेंडू, पांढरी व पिवळी शेवंती, त्यांचे हार यामुळे फुलबाजार बहरून गेला आहे. गोवावेस, समादेवी गल्ली, खडेबाजार, नाथ पै सर्कल, काकतीवेस अशा सर्व ठिकाणी उसांचे भारे घेऊन विपेते पहाटेच दाखल झाले होते. पूजेसाठी लागणारी फळे प्रामुख्याने केळी यांची आवक वाढली. शिवाय यादिवशी दुकानात कोहाळा बांधला जातो किंवा दुकानासमोर फोडला जातो. त्यामुळे कोहाळय़ांची विक्रीसुद्धा मोठय़ा प्रमाणात झाली. तसेच बत्तासे, भेंड, चिरमुरे, पेढे यांचीही विक्री तेजीने झाली.
खातेकीर्द वहय़ांना मागणी
लक्ष्मीपूजन करून खातेकीर्द वहय़ांमध्ये हिशेब लिहिण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे खातेकीर्द वहय़ांना चांगलीच मागणी होती. सराफ व्यावसायिकांसह सर्वच लहान-मोठे विपेते या वहय़ांची पूजा करून आर्थिक जमा-खर्चाच्या नोंदीचा श्रीगणेशा करणार असल्याने वहय़ांची विक्री तेजीत झाली.