स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशन व आंध्रप्रदेश शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 13 वी मि.इंडिया पुरूष व महिला वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव व फिजिक स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन 23 ते 25 एप्रिल रोजी गुरूराज कलाशास्त्रम सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, विश्व शरीरसौ÷व संघटनेचे सचिव चेतन पाठारे व मि. ऑलिंपिक प्रेमचंद डिग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन होत आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद मधोक व महिला सचिव हिरल शेठ यांनी या स्पर्धेची सर्व जबाबदारी हाती घेतली आहे. विश्व शरीरसौष्ठव फेडरेशनच्या नियमानुसार ही स्पर्धा भरविण्यात येणार आहे. 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 100, 100 किलोवरील अशा 10 वजनी गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व खेळाडूंची भोजन-निवासाची, प्रवासाची सोय संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील पंचांचीही सर्व सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, पदके व भेटवस्तु देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुरूष फिटनेस फिजिक, पुरूष ऍथलेटीक फिजिक या गटातही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 23 एप्रिल रोजी सर्व शरीरसौ÷वपटूंची वजने घेण्यात येणार आहेत.