वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांकडून दोन्ही पोलीसांचा सत्कार
वेंगुर्ले/ वार्ताहर-
वयोवृध्दाला जिवदान देण्यासाठी माणुसकिची जपणाऱ्या वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर व पांडुरंग खडपकर यांचे वृत्त दै. तरूण भारतच्या सोशल मिडीयावर प्रसिध्द होताच त्याची दखल जिल्हापोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घेतली. तात्काळ वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना संपर्क साधून दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या सुचनाही दिल्या. त्यानुसार उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या समक्ष दोन्ही पोलीसांचा खास सत्कार करण्यांत आला.
आशिर्वाद कॉम्पलेक्समधील शिवराम उर्फ भाऊ बांदेकर (82) या वयोवृध्दाला वेंगुर्लेतील दोन पोलीसांनी माणुसकिचे भान ठेवून बेशुध्दावस्थेत त्याच्या घरातून हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्याच प्राण वाचले. असे माणुसकिचे काम करणाऱ्या त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना सपंर्क साधून करीत त्या दोन्ही कर्मचाऱ्याचा सत्कार करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनध्ये ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर व पांडुरंग खडपकर या दोनी पोलीसांचा पोलीस स्थानकांतील उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यासमक्ष सत्कार केला.
पोलीसांबद्दल जनतेत चांगली प्रतिमा वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर व पांडुरंग खडपकर यांनी निर्माण केली आहे. त्या दोन्ही पोलीसांचा आदर्श इतर पोलीसांनी घेऊन अशा प्रकारचे माणुसकिचे दर्शन घडविणारे काम करावे. असे आवाहनही पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले. असल्याची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी दोन्ही पोलीसांच्या सत्कार समारंभ प्रसंगी दिली.