प्रतिनिधी/ बेळगाव
झाडशहापूर येथे दिवसा दरोडा घालून पळून जाणाऱया चोरटय़ांना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले होते. त्याबद्दल त्या दोन पोलिसांचा सत्कार गोगटे कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आला. शाल, श्रीफळ व 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड या दोन पोलिसांनी झाडशहापूर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठय़ा धाडसाने झडप घालून या जोडगोळीला अटक केली होती. त्यांच्याजवळ चाकू, जांबिया, पिस्तुल, जिवंत काडतुसे आदी घातक शस्त्रs आढळून आली आहेत. तशा परिस्थितीतही त्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले, ही मोठी धाडसाची बाब आहे. त्यामुळेच या दोघांचा शिरीषराव गोगटे यांनी सत्कार केला.