मुख्यमंत्रीपद नसल्याचा फटका बसण्याची शक्यता
उत्तराखंडच्या देहरादून जिल्हय़ात डोईवाला विधानसभा मतदारसंघ मोडतो. देहरादून जिल्हय़ातील हा मतदारसंघ अनारक्षित आहे. डोईवाला हा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अनेक घोषणा केल्या होत्या.
डोईवाला विधानसभा मतदारसंघ 2008 मध्ये झालेल्या परिसीमनाच्या नंतर अस्तित्वात आला. डोईवाला मतदारसंघासाठी 2012 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना विजयी केले होते.
निशंक पुढील काळात 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी होत खासदार झाले. लोकसभेसाठी निवडून गेल्यावर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि तेथे पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत भाजपने त्रिवेंद सिंह रावत यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळविला.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिवेंद्र सिंह रावत यांनी काँग्रेसचे उमेदवार हीरा सिंह बिष्ट यांना पराभूत केले होते. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर त्रिवेंद्रसिंह मुख्यमंत्री झाले.
डोईवाला विधानसभा मतदारसंघात सर्व जात-समुदायांचे वास्तव्य आहे. या मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मतदार आहेत. मतदारसंघात मागास वर्गाच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे मतदार येथील निकाल प्रभावित करू शकतात.