रजनीकांत यांच्यासाठी चाहत्याने फोडले 198 नारळ , मन सोरू प्रथेकरता फरशीवर अन्न ठेवून केले ग्रहण
सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यानी रविवारी तामिळनाडूच्या मदुराई जिल्हय़ातील थिरुपंक्येंद्रम मुरुग्रन मंदिरात ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत एक विशेष पूजा केली आहे. चाहत्यांनी 108 नारळ अर्पण करून ‘मन सोरू’ (जमिनीवर अन्न ठेवून जेवणे) प्रथा पार पाडली आहे. या पुजेत रजनीकांत यांचा आगामी चित्रपट अन्नात्थेच्या यशासाठीही प्रार्थना करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी आमचा सुपरस्टार थलैवाला त्यांच्या आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्ही ते लवकर बरे व्हावेत आणि चित्रपटाच्या यशासाठी सामूहिक प्रार्थना करत आहोत असे त्यांचे चाहते कुमारवेल यांनी म्हटले आहे.
2018 मध्ये त्यांच्या रोबोट 2.0 चित्रपटाच्या यशासाठी चाहत्यांनी मन सोरूची प्रथा पार पाडली होती. याचबरोबर 2020 मध्ये दरबार चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हा प्रकार झाला होता. या विशेष विधीदरम्यान भात आणि उर्वरित अन्न कुठल्याही प्लेटमध्ये न ठेवता जमिनीवरच वाढले जाते. त्यानंतर विधीसाठी संकल्प घेणारा व्यक्ती तो हे अन्न ग्रहण करतो.