बेंगळूर/प्रतिनिधी
“दंत आरोग्याबाबत ग्रामीण भागातील जनजागृती करण्याची गरज आहे,” असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दंत चिकित्सक दिनानिमित्त बोलताना मंत्री सुधाकर यांनी परदेशातील लोक वर्षामध्ये कमीतकमी दोनदा दंत तपासणीसाठी जातात तर आपल्या ग्रामीण भागातील लोक वेदना झाल्यानंतरच दंतचिकित्सकांना भेट देतात.
दातांची काळजी घेण्याबाबत भारतात जागरूकतेचा अभाव आहे, आम्हाला विशेषत: ग्रामीण भागात याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी ग्रामीण भागातील लोक अजूनही कोळशाच्या पावडरचा वापर करतात आणि आजही दात पेस्ट वापरण्याविषयी अनभिज्ञ आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दंत उपचाराचा खर्च खूपच कमी आहे. दंत आरोग्य चांगल्या स्थितीत राहण्यासाठी लोकांनी याचा उपयोग केला पाहिजे, असे डॉ.सुधाकर म्हणाले.