वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
कोरोना महामारी संकटामुळे दक्षिण आफ्रिकामध्ये सर्व क्रीडाहालचाली ठप्प झाल्या होत्या. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंच्या सरावाला पुन्हा प्रारंभ झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्रालयाकडून क्रिकेटपटूंना पुन्हा सराव करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली.
कर्णधार डि कॉक आणि अन्य 44 क्रिकेटपटूंनी आपल्या सरावाला सोमवारी प्रारंभ केला. 15 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेतील सर्व क्रिकेट हालचाली कोरोना महामारीमुळे ठप्प झाल्या होत्या. कोरोना महामारीला प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या दौऱयावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आपला दौरा आटोपता घ्यावा लागला होता. तीन सामन्यांच्याची वनडे मालिका रद्द करण्यात आली होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे आयोजिलेल्या क्रिकेटपटूंच्या सरावावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचा काटेकोरपणे अवलंब केला जात आहे. सरावाच्या पहिल्या दिवशी क्रिकेटपटूंनी गटाने आपला सराव केला.