केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी मॉडर्ना लस स्वतः विकसित केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची लस ही आफ्रिकेतील विविध राज्यांमध्ये लसीकरणासाठी वापरली जाणार असल्याचे तेथील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आफ्रिजेन बायोलॉजीक्स यांनी स्वतःची मॉडर्ना लस विकसित केली असून तिची प्रायोगिक तत्वावरची चाचणी नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार असल्याचे समजते. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधकांनीही सदरच्या स्वतंत्र लस निर्मितीला होकार दिल्याचे कळते. आफ्रिजेन बायोलॉजीक्स या संस्थेचे संचालक पेट्रो टरब्लँचे यांनी सांगितले की, सुरुवातीला कमी प्रमाणात लस निर्मितीला सुरूवात होणार असून नंतर त्यामध्ये वाढ करून स्वतंत्रपणे लस निर्मितीला वेग दिला जाणार आहे. यायोगे हा देशही लस निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. फायझर बायोंटेक यांनी ज्या प्रमाणे लसीसाठी तंत्रज्ञान वापरले आहे तेच तंत्रज्ञान आफ्रिकेनेही मॉडर्नाच्या लस निर्मितीकरीता वापरले असल्याचे येथील तज्ञांनी सांगितले आहे.