प्रतिनिधी /मडगाव
शेळपे येथील जल प्रकल्पात बुधवार दि. 23 व गुरूवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत तातडीचे दुरूस्ती काम हाती घेतले जाणार असल्याने सांगे, केपे, सासष्टी आणि मुरगांव तालुक्यांना मर्यादित पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
सलग दोन दिवस मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्याने वरील तालुक्यातील लोकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.