नवी दिल्ली
अखेर सॅमसंग गॅलेक्सी ए 32भारतामध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या कार्यालयीन साईटवर यासंदर्भात किमत आणि स्पेसिफिकेशनची यादी दिली आहे. भारतामध्ये गॅलेक्सी ए32 हा फोन दमदार कॅमेऱयांच्या सुविधांसोबत सादर झाला आहे. सदरचा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसोबत विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सदरच्या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 5000 एमएएच बॅटरी मिळणार आहे. यासोबत फोन चार रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. कार्यालयीन वेबसाईटवर याची किमत ही 21,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.