पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी बॉलिवूडमधील अनेक दमदार गाणी गायली आहेत. दलेर मेहंदीचा देश-विदेशात मोठा फॅन फॉलॉव्हिंग आहे. ‘बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले’ या सारखी त्यांची गाणी प्रचंड गाजली आहेत. आता ही त्यांनी मेटाव्हर्सवर गाण म्हटल आहे. त्याला ही चाहत्यांनी पसंदी दर्शवली आहे. दलेर मेहंदी मेटाव्हर्सवर कार्यक्रम सादर करणारा पहिला भारतीय परफॉर्मर ठरला आहे. दलेर मेहंदीने भारताचा पहिला मेटाव्हर्स कॉन्सर्ट देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केला होता. या कार्यक्रमाची घोषणा त्याने 17 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवरुन केली होती. ‘आगे बढो छू लो आसमा’ या गाण्यावर त्याने परफॉर्म केला. काल्पनिक विश्वात गाण गायल्यानंतर दलेर मेहंदी एका प्लॅटफॉर्मवर त्याच्या चाहत्यांना भेटतो याचा त्याला आनंद होतो. असा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. मेटाव्हर्स पाहण्यासाठी एकाचवेळी 15 लाख युजर्संनी लॉगिन केले होते. मात्र यावेळी तांत्रिक अडचण आल्याने काहींना लॉगइन प्रॉब्लेम आला होता. आतापर्यंत 2 कोटी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आहे. मेटाव्हर्स म्हणजे आभासी जग. पार्टी नाईट म्हणजे ‘डिजिटल पॅरलल युनिव्हर्स’ जे ब्लॉकचेनवर चालते. यावर युजर्स गेम खेळू शकतात. याआधी जस्टिन बीबर आणि ट्रेव्हिस स्कॉट सारख्या आंतरराष्ट्रीय गायकांनी मेटाव्हर्सवर कार्यक्रम सादर केले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये एका जोडप्याचा लग्न सोहळा मेटाव्हर्सवर आयोजित केला होता. आणि आता दलेर मेहंदी यांनी यामध्ये गाणे म्हटले आहे.
Previous Articleजिल्हय़ात आजपासून शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार!
Next Article चिमुरडय़ाला नाव नसलेला दुर्लभ आजार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.