वार्ताहर / मौजे दापोली
दापोलीच्या पाऱ्यात कमालीची घसरण होत असल्याने दापोलीकरांना चांगलीच हूरहूडी भरली आहे. त्यामुळे दापोलीतील आंबा,काजू बागायतदार चांगलेच सुखावले आहेत.
आता गुलाबी थंडीला सुरूवात झाली असुन, बुधवारी दापोलीचा पारा 11.2 अंश सेल्सिअस असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासून गुरूवारपर्यंत चांगल्या प्रकारे थंडी पडली. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर बाहेर काढले असून शेकोट्या पेटविण्यास देखील सुरूवात केली आहे.