दापोलीत सोशल मीडियावर अफवांना पूर
दापोली / प्रतिनिधी
दापोलीतून गेल्या तीन दिवसात पाठवलेल्या २७४ जणांच्या स्वॅबचे अहवाल पाठवण्यात आले होते. यापैकी ९७ जणांच्या स्वॅबचे अहवाल दापोली प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याने प्रशासनाने अंशतः सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र यात ए .जी. हायस्कूल येथून शिक्का मारून घरी पाठवलेल्या तरुणांच्या संपर्कात आलेल्यांचे १७७ जणांचे स्वॅब अद्याप येणे बाकी असल्याने दापोली शहर अद्याप वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.
दापोली येथे सोमवारी मुंबईतून आलेल्या माटवण येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला यानंतर त्या महिलेला रत्नागिरीत पाठवण्यात आले असले तरी तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी काढून त्यांचे कोरोना त्यांचे स्वॅब काढून ते तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामध्ये त्या महिलेच्यानिकट संपर्कामध्ये आलेले तिचे नातेवाईक, ती आजारी असल्याने तिला पाहिला आलेले आप्तेष्ट, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचे स्वॅब काढून तपासणीकरिता पाठवण्यात आले होते. हे ९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र यानंतर मंगळवारी दापोलीत मुंबईतून एप्रिल महिन्यात चालत आलेल्या २७ जणांपैकी दोघा युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. शिवाय यातील एका युवकाला युवकांच्या हातावर आरोग्य कर्मचाऱ्याने होमक्वारंटाईन शिक्का मारून त्याला घरी पाठवले होते.
दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला शोधून आणून पुन्हा अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. या दरम्यान हा युवक ज्या भागातील ज्या लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात आला या सर्वांचे नमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत. या सर्वांचे अहवाल अद्याप बाकी असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी सकाळी तरुण भारतशी बोलताना दिली. हे १०६ जणांचे येणे अद्याप बाकी आहे. तसेच गुरुवारी घेण्यात आलेले ७१ जणांच्या अहवाल देखील अद्याप येणे बाकी असल्याने दापोली तालुक्याला आता १७७ जणांच्याच्या स्वॅबच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. यामुळे माटवण प्रकरणातील माटवण येथील महिलेच्या संपर्कात आलेल्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी कोरोना ग्रस्त युवक दापोलीत फिरल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. यातील १०६ जणांचे अहवाल आज शुक्रवार सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी तरुण भारतशी बोलताना दिली. तसेच दापोली शहरात फिरलेल्या युवकांच्या संपर्कात आलेल्या बद्दल कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.