प्रतिनिधी / दापोली
आपल्या प्रलंबित मागण्या करीता दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील आज सोमवारपासून संपामध्ये सहभाग नोंदवला. मात्र यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले.
सकाळी वस्तीच्या एसटी फेऱ्यांमधून दापोलीत कामाकरिता व नोकरी करिता आलेल्या अनेक महिला, मुली वृद्ध नागरिक व कर्मचारी यांचे परतीच्या गाड्या न मिळाल्यामुळे अतोनात हाल झालेले पाहायला मिळाले. हा संप पूर्वनियोजित असता तर आपले हाल वाचले असते अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अचानक रद्द करण्यात आल्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, नाशिक आदी ठिकाणी जाणाऱ्या लोकांचे देखील अतोनात हाल पाहायला मिळाले. मात्र या संपामुळे खाजगी वाहतूक साऱ्यांचा चांगला फायदा झाला.