मौजेदापोली/ वार्ताहर
दापोली तालुक्यातील दाभोळ येथे अचानक 10 कावळय़ांचा मृत्यू झाल्याने गावात घबराट पसरली आहे. परंतु या कावळय़ांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लेंढे यांनी सांगितले.
दाभोळ बसस्थानक व दाभोळ धक्का परिसरात कावळे मृतावस्थेत आढळले होते. ग्रामपंचायत कार्यालयाने पशुवैद्यकीय अधिकाऱयांद्वारे मृत कावळय़ांची तपासणी केली. या बाबत डॉ. लेंढे यांनी या कावळय़ांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले. अधिक प्रमाणात मृत कावळे दिसून आल्याने बर्ड फ्ल्यूची शंका व्यक्त होत होती. परंतु हे कावळे विषबाधेने मृत झाल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱयांनी केले आहे.
…