आपण केलेल्या गोदानाचे वर्णन करताना नृगराजा पुढे म्हणाला –
सफळ विद्या विनयितेकरून । बुद्धीचें फळ अनाग्रह पूर्ण । फळ पापाचें याञ्चाव्यसन । तपस्वी फळवान् दातृत्वें ।श्रौतस्मार्ताद्यनु÷ानें । सफळ ज्यांचीं वेदाध्ययनें । दत्तभुक्तें ज्यांचीं धनें। रतिसंतानें सफळ वधू । सुशीळा साध्वी वनिता सदनीं । परापवाद अनृत वदनीं । अभेध्य मानिती श्वपळाहूनी। इत्यादि सद्गुणीं मंडित जे । आर्यवर्यचर्या पाहीं । शील न भंगे काळीं कहीं । कुटुंब सुखदुःखाच्या ठायीं।हर्षामर्षा नातळती। यथोक्त अनु÷ानाच्या भरिं । कुटुंब खेद पावतां घरिं। सज्ज न होती तत्परिहारिं । अनाचारिं स्पर्शोनी । अवस्थात्रयीं सत्यव्रती । न करिती दंभाची प्रवृत्ति। निष्कामतपस्वी ईश्वरप्राप्ती । श्रुतिवेदान्तीं श्रवनपर। तपश्चर्यादिगुणेंकरून । ज्यांतें जाणती जगाचे श्रवण। ब्रह्म म्हणिजे निगमाध्यापन । उत्कृष्ट वदान्य अमृतत्वें। धीर उदार सत्यव्रती । सुशीळ तपस्वी पुण्यकीर्ति । ऐसिया दानपात्रां द्विजांप्रति। यथानिगुती अर्चूनी। विष्टमधुपर्कपुरस्सर। शाखाध्ययनें गोत्रोच्चार। करूनि स्वसत्तापरिहार। त्यागोत्पादन तत्सत्ता। एवमादि विधिविधानें। यथासाङ्गें गोप्रदानें । पूर्वोक्त सत्पात्रांकारणें । दिधलीं द्रव्यें तें ऐकें ।
जे श्रे÷ ब्राह्मणकुमार सद्गुणी, शीलसंपन्न, कुटुंबपोषणास असमर्थ, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे, चारित्र्यसंपन्न आणि तरुण होते, त्यांना मी वस्त्रे, अलंकार देऊन गाईंचे दान करीत असे.
चतुर्धा भूमिदानाची परी । वृत्तिसदनायतनक्षेत्रीं ।
चारी प्रकार सविस्तरिं । श्रोतीं चतुरिं परिसावें ।
जीविकोद्देशें मिराशी करणें । वृत्तिभूमि त्यातें म्हणणें। नांदावया निलय देणें । सदानदानें त्या भूमी। वापीकूपजलाशयें । यज्ञस्थानें देवालयें ।
धर्मशाळा प्रपानिलयें । आयतनरूपा या भूमी ।
सजल निर्जल क्षेत्रें कृषि । वाटिका वनें वृक्षविशेषीं ।
इत्यादि चतुर्विध भूदानासी । सत्पात्रासी समर्पिलीं ।
याचि प्रकारें हिरण्यदानें । ग्रंथ वाढेल बहुव्याख्यानें ।
अश्वगजादि शिबिका यानें । विप्रांकारणें समर्पिलीं ।
कन्यादानें सालंकृतें । दासदासीसमृद्धियुक्तें।
विप्रांकारणें यथोचितें । दिधलीं बहुतें भगवंता ।
रौप्यप्रमुख अष्ट लोह । तिलपात्रादि धान्यनिचय ।
वितानें जवनिका शय्याविषय । उपबर्हणें सतूळिका। नानाविध वसनदानें । वज्रमुक्तादि अनेक रत्नें। सोपस्करें रथादि यानें । अश्वसारथी शिबिरेंसीं । संस्थापूर्वक शत क्रतु । यजिले अच्छिद्र सालंकृत। वनोपवनें बहुधा पूर्त । वापीकूपादि निर्मिलीं । ऐसें सांगूं कोठवरी । हृदयस्थ जाणसी श्रीहरि । सुकृत करितां पदिलों घोरिं । काय निमित्त तें ऐका ।
अशा प्रकारे मी पुष्कळशा गायी, जमीन, सोने, घरे, घोडे, हत्ती, दासींसहित कन्या, तिळांचे पर्वत, चांदी, अंथरुणे, वस्त्रे, रत्ने, गृहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले. अनेक यज्ञ केले आणि पुष्कळशा विहिरी, तलाव इत्यादी बांधले.
कोणी एक विप्राग्रणी । वेदविहितकर्माचरणी ।
निवृत्त प्रतिग्रहापासुनी । प्रारब्धक्षेपणी मोक्षेच्छु ।
ऐसिया विप्रमुख्याप्रति । प्रार्थूनियां विनयभक्ती ।
पूर्वोक्त धेनु अर्पिली निगुती । आश्रमा नेतां तो तीतें ।