ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र, राज्यातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. बिहारमध्ये मागील 24 तासात 1,700 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर आता पर्यंत 1 लाख 41 हजार 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या एका दिवसात 1,421 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 866 वर पोहचली आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.99 % आहे. तर आतापर्यंत 808 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 47 लाख 73 हजार 917 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 14 हजार 899 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- शहर कोरोना रुग्णांचा एकूण आकडा
- अररिया 4163
- कटीहार 5139
- मुजफ्फरपुर 6954
- बेगूसराय 5821
- नालंदा 5056