ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाची बाधा झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांचा फुफ्फुसांना संसर्ग झाला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी स्मार्ट रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बुधवारपासून त्यांना ताप होता तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे गुरुवारपासून त्यांना ऑक्सिजनच्या सहाय्याने श्वास दिला जात होता. आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवले असून सध्या त्यांची प्रकृती नाजूक आहे, असे सांगण्यात आलेे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितले की, जैन यांच्या फुफ्फुसातील न्यूमोनियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जैन यांना अधिक थकवा जाणवत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आम्ही सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.