ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत शनिवारी दिवसभरात 2948 नवे कोरोना रुग्ण आढळून आले.
त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 80 हजार 188 वर पोहचली आहे. यामधील 28 हजार 329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 2210 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 49 हजार 301 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहेे.
शनिवारी 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 2,500 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.