ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. दहा दिवसात दुसऱ्यांदा दिल्ली भूकंपाने हादरली आहे.
याआधी 17 डिसेंबर रोजी राजस्थानच्या अलवेर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 4.2 इतकी होती. याचे झटके दिल्ली – एनसीआरमध्ये जाणवले होते. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी दिल्ली – एनसीआरमध्ये भूकंप झाला होता, त्याची तीव्रता 2.7 इतकी होती.