ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. तर यावर्षी 12 जानेवारी नंतर पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.
बुधवारी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, मागील 24 तासात 370 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. तर एक दिवसापूर्वी 320 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बुधवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 42 हजार 030 वर पोहचली आहे. यामधील 1,900 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 279 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 29 हजार 199 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,931 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 30 लाख 11 हजार 703 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 45, 322 आरटीपीसीआर टेस्ट आणि 25,831 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.