- केजरीवाल सरकारने दिले आदेश
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आरटी – पीसीआर चाचणी आता अधिक स्वस्त होणार आहे. याबाबतचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
ते म्हणाले की, दिल्लीत कोविड 19 ची तपासणी सरकारी रुग्णालयात तर निःशुल्क केली जाते पण आता खाजगी लॅब मध्ये देखील ही तपासणी कमी किंमतीत केली जाणार आहे.
सत्येंद्र जैन यांच्या मते, आम्ही लवकरच याबाबतचे आदेश देऊ. सध्या दिल्लीत आरटी – पीसीआरची चाचणी 2400 रुपयात केली जाते. सरकारने या चाचणीसाठी 1000 हजार रुपये आकारण्यात यावेत, असा प्रस्ताव ठेवला आहे. तर आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीची किंमत 1000 पेक्षा कमी ठेवली तरी चालू शकते.