ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 3,036 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 14 हजार 224 वर पोहचली आहे. यामधील 21,490 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 2,036 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 86 हजार 880 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,854 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 37 लाख 14 हजार 323 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,023 आरटीपीसीआर टेस्ट आणि 43,334 रैपिड एंटिजेन टेस्ट मंगळवारी करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.52 % आहे.