ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार वालिया यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात आज पहाटे 1.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील तीन दिवसांपासून ते गंभीर आजारी होते.
डॉ. अशोक कुमार वालिया हे सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी आरोग्य, नगरविकास, जमीन आणि बांधकाम विभाग यांचा कार्यभार संभाळला आहे.
डॉ. अशोक कुमार वालिया यांचा जन्म दिल्लीत 8 डिसेंबर 1948 रोजी झाला होता. 1972 मध्ये त्यांनी इंदौरमधील एमजीएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची डिग्री घेतली त्यानंतर ते फिजिशियन म्हणून काम करत होते.