ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे आरोग्य मंत्री आज पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली. तसेच त्यानंतर ते आज पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहेत.
17 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार सौपवण्यात आला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देत त्यांना शुभेच्छा दिल्या. केजरवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आमचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती आता सुधारली आहे. ते आजपासून कामावर रुजू होत आहेत. त्यांनी नेहमीच विविध रुग्णालयांचा दौरा करत, बैठकी घेत फिल्डवर काम केले आहे. त्या दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता एक महिन्यानंतर ते पुन्हा एकदा कामावर हजर होत आहेत. त्यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा.