नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
दिल्लीतील न्यायालयाने २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आणखी एका खटल्यात दीप सिद्धूला जामीन मंजूर केला आहे.
दीप सिद्धू यापूर्वी १४ दिवस पोलीस कोठडीत होता. त्याची चौकशी पोलिसांनी केली आहे. यापूर्वीच्या मुख्य प्रकरणातही त्याला या आधारावरच जामीन देण्यात आला होता. त्यामुळे आता तर ७० दिवस झाले आहेत. या आधारावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिद्धूला अटक केली होती. २३ फेब्रुवारीला त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.