ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रोज नवे नवे उच्चांक गाठत आहेत. त्यातच मागील 24 तासात 19 हजार 832 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 341 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 12 लाख 92 हजार 867 वर पोहोचली आहे. तर संक्रमणाचा दर 24.92 % इतका झाला आहे.
त्यातच मागील 24 तासात 19, 085 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 11 लाख 83 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 18,739 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 91 हजार 035 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 76 लाख 77 हजार 125 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 65,663 आरटीपीसीआर टेस्ट आणि 13,930 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 50,785 झोन आणि 1025 कंट्रोल रूम आहे.