ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 4235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 304 वर पोहचली आहे. यामधील 26,812 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 3403 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1 लाख 84 हजार 748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4,744 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 20 लाख 39 हजार 432 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 10,116 आरटीपीसीआर टेस्ट आणि 45,540 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.48 % आहे. तर 1488 झोन आणि 197 कंट्रोल रूम आहेत.