कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 39बळी, 1249 नवे रूग्ण, 1538 कोरोनामुक्त
अँटीजेन टेस्ट दुप्पट तरीही रूग्णसंख्या कमी, सक्रीय रूग्णसंख्येत मोठ्या संख्येने घट
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाने 39 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 249 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 8 हजार 913 झाली आहे. दिवसभरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 19 हजार 468 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात 827 नवे रूग्ण दिसून आले. तपासणीची टक्केवारी पाहिल्यास जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला आहे. दरम्यान, शहरात दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 39 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 485 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 385, नगरपालिका क्षेत्रात 674, शहरात 919 तर अन्य 515 आहेत. दिवसभरात 1 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 30 हजार 251 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 249 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 50, भुदरगड 21, चंदगड 21, गडहिंग्लज 39, गगनबावडा 2, हातकणंगले 166, कागल 62, करवीर 184, पन्हाळा 100, राधानगरी 32, शाहूवाडी 17, शिरोळ 128, नगरपालिका क्षेत्रात 113, कोल्हापुरात 273 तर अन्य 41 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 43 हजार 649 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 19 हजार 468 अहवाल आले. त्यापैकी 18 हजार 641 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 51 अहवाल आले. त्यातील 2 हजार 704 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 14 हजार 936 अहवाल आले. त्यातील 14 हजार 251 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 748 रिपोर्ट आले. त्यातील 445 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 19 हजार 468 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरात कोरोनाने 14 जणांचा मृत्यू, परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू
कोरोनाने परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये सांगली आणि बेळगाव जिल्ह्Îातील दोघांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील 14 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये घोरपडे गल्ली शाहूपुरी, डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी, शिवाजी पेठ, नागाळा पार्क, आझाद गल्ली गुजरी कॉर्नर, साळोखेनगर साने गुरूजी वसाहत, कोल्हापूर शहर, चावरेकर चाळ लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, राजारामपुरी, रामानंदनगर, अंबाई टँक रंकाळा, न्यू शाहूपुरी, कागलकरवाडी कसबा बावडा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण 1249 : एकूण : 1,43,649
कोरोनामुक्त 1538 : एकूण : 1,30,251
कोरोना मृत्यू 39 : एकूण मृत्यू : 4485
सक्रीय रूग्ण : 8913