जिल्हाधिकाऱयांचे आदेश : आरोग्य यंत्रणा समन्वय समिती आढावा बैठक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना सध्या आटोक्मयात आहे. तथापि दिवाळीचा सण दोन दिवसांवर आला आहे. या दिवसांत जिल्हय़ात मुंबई तसेच इतर भागातून येणाऱयांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना टेस्ट वाढवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिले. जिल्हय़ामध्ये आर. टी. पी. सी. आर. व रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य यंत्रणेच्या समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱयांनी घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. नलावडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रबोधन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोरोना टेस्ट करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात यावी. त्यासाठी प्रशिक्षित वर्ग उपलब्ध करण्यात यावा. कोरोना टेस्टबरोबरच बाहेरून येणाऱया व्यक्तींची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान यांची टेस्ट करण्यात यावी. हे सर्व काम करताना डॉक्टर, नर्स व इतर संबंधित कर्मचाऱयांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
माकडताप रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
कोरोनाची साथ आटोक्मयात असली, तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिले. जिल्हा रुग्णालयामध्ये मॉलिक्मयुलर लॅब तयार झाली आहे. सध्याचा काळ हा माकडतापाची साथ सुरू होण्याचा काळ आहे. त्यामुळे माकडतापाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी लागणारी अनुषंगिक उपकरणे व यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
साधन सामुग्रीमध्ये काही उपकरणे कमी पडत असतील, तर त्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाठविण्यात यावा. या साधनसामुग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. माकडताप रुग्णांना लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावीत. त्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. औषधांचा साठा आरोग्य यंत्रणेकडे तयार असावा. औषधे खरेदी करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. जिल्हय़ामध्ये कोणत्याही ठिकाणी माकड मृत आढळल्यास व ते कोणाच्याही निदर्शनास आल्यास संबंधितांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. त्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. केएफडी सद्यस्थिती, लसीकरण नियोजन, मृत माकड विल्हेवाट, रुग्ण व्यवस्थापन आदींचाही जिल्हाधिकाऱयांनी सविस्तर आढावा घेतला.