परिवहन मंत्रालयाची योजना- दिव्यांगांच्या सुविधेकरता निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्ते परिवहन मंत्रालय दिव्यांगांना दिलासा देण्याकरता नियमांमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. या बदलानंतर निश्चित मापदंडांनुसार कंपन्यांकडून वाहनांमध्ये सुधारणा करवून घेता येणार आहे. रोड सेफ्टी विंग मापदंड याकरता निश्चित करत असून रस्ते परिवहन मंत्र्यांकडे ते मंजुरीसाठी पाठविले जातील, त्यानंतर मंत्रालयाकडून अधिसूचना काढण्यात येणार आहे.
देशात अनेक जण दिव्यांगत्व असूनही वाहनात किंचित सुधारणा घडवून ते चालविण्यास सक्षम आहेत. दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी मंत्रालय हा बदल करणार आहे. यामुळे दिव्यांगांना वाहतुकीसाठी कुणावर निर्भर रहावे लागणार नाहे. वाहनात मोडिफाय केल्यावर दिव्यांग प्रादेकिश परिवहन कार्यालयाकडून परवाना देखील प्राप्त करू शकणार आहेत.
मंत्रालयानुसार दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या सुविधेनुसार एक्सेलेटर, ब्रेक आणि क्लचचे स्थान बदलून घेऊ शकणार आहे. अशाप्रकारचे अनेक बदल घडवून आणता येणार आहेत. या बदलांमध्ये रस्ते सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. दिव्यांगांना स्वतःच्या मर्जीनुसार बदल करता येणार नाहीत. याकरता निश्चित मापदंड असतील, हे बदल सामान्य मॅकेनिककडून करवून घेता येणार नाहीत. हे बदल कंपन्यांच्या माध्यमातूनच करता येणार आहेत.
कलर ब्लाइंडनेस असणाऱयांना दिलासा रस्ते परिवहन मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी रंग आंधळेपणा असणाऱया लोकांना दिलासा दिला होता. यामुळे देशातील 9 कोटीच्या आसपास कलर ब्लाइंडनेस लोक वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करू शकतात. रस्ते परिवहन मंत्रालयाने यासंबंधी एम्समध्ये अध्ययन करविले होते, ज्याच्या निष्कर्षानंतर परवाना संबंधी नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कमर्शियल लायसन्ससाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. सामान्य लोक कुठल्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय परवाना प्राप्त करू शकतात.