क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्विमर्स क्लब बेळगाव व ऍक्वेरियस जलतरण क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला असून पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. मदन गोडबोले यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
केएलई जेएनएमसी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात या शिबिराचे डॉ. मदन गोडबोले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने उद्घाटन केले. या शिबिरात 60 दिव्यांग मुलांनी भाग घेतला असून, त्यामध्ये मतिमंद मुलांचा समावेश आहे. त्यांना ने-आण करण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यापूर्वी अशा दिव्यांग व मतिमंद मुलांना मोफत प्रशिक्षण दिल्यामुळे त्यामधून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडले आहेत. राजेश शिंदे, राघवेंद अणवेकर, मोहीन जुनेदी, उमेश खाडे, श्रीधर माळगी, सीमरन गुंडकलकर, आतिश जाधव, श्रीकांत देसाई, अमोघ कांबळे आदी खेळाडूंचा त्यात समावेश आहे. सदर प्रशिक्षण शिबीर 5 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सीमरन गुंडकल ही सध्या स्पोर्ट्स ऍथॉरीटी ऑफ इंडिया गुजरात सेंटरमध्ये सराव करीत आहे. यावेळी अभियंता गंगाधर ई., अभियंता महांतेश नरसण्णावर, बसवराज विभूते, सचिन बिच्चू, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर, मधुकर बागेवाडी, राजेश शिंदे, राघवेंद्र अणवेकर, मोईन जुनेदी, कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सुरेश भट हे मदत करत असून त्यांना प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, विनोद दोडमनी, विनायक आंबेवाडीकर, प्रसाद वेर्णेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.