प्रतिनिधी /बेळगाव
नावगे येथील दि ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे गोवन सीफूड फेस्टिवल ला बेळगाव च्या खाद्यप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि ऑर्चर्ड रिसॉर्ट च्या नयन रम्य वातावरणात व संगीताच्या तालावर गोवन फूड फेस्टिवल बेळगावकरांचा आनंद द्विगुणीत करत आहे. निसर्ग संपन्न परिसर व गर्द झाडीत वसलेले हे रिसॉर्ट म्हणजे बेळगावकरांचं आवडते स्थळ आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर दि ऑर्चर्ड रिसॉर्ट ची सजावट एक वेगळीच रंगत निर्माण करत आहे. गोवन सीफूड फेस्टिवल मध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असून बेळगाव च्या खाद्य प्रेमींसाठी पर्वणीच आहे. विविध प्रकारच्या खेकडय़ांचे पदार्थं विविध प्रकारचे स्पेशल फिश डिशेस खास शेफ नीं बनविले असून बेळगाव शहरात प्रथमच अशा प्रकारच्या खाद्य पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. खास मसाल्यांनी बनवलेले विविध मत्स्य पदार्थं हे खास आकर्षणाचा विषय ठरले आहेत.