सावर्डेतून अपक्ष लढण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / गोवा
भाजपने उमेवारी न दिल्याने दीपक पाऊसकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असुन पाऊसकर हे सावर्डे मतदार संघातुन लढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वीच आपण अपक्ष लढणार असल्याचे आपली भुमिका स्पष्ट केली होती.
भाजपमधुनच निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ऐनवेळी भाजपने त्यांचा पत्ता कट केला होता. मात्र उमेदवारी देण्याचे भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.
दीपक चंद्रकांत प्रभू पाऊसकर हे 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून सनवॉर्डेम येथून गोवा विधानसभेवर निवडून आले. डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांची सार्वजनिक बांधकाम आणि वस्तुसंग्रहालय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.