खाद्यप्रेमींची पहिली पसंती
जर कोरोनानंतरच्या काळात दुबईत जाण्याचा विचार करत असल्यास तेथे थाळीत वाढण्यात येणारे भारतीय जेवण अवश्य अनुभवा. दुबईच्या इंडिया क्लबच्या शहंशाह थाळीचे वजन 11 किलो आहे. यात 36 खाद्यपदार्थ असून ते परिपूर्णतेने तयार केलेले आहेत. या थाळीला सजविण्यासाठी सुमारे अर्ध्या तासाचा वेळ लागतो. यात गुलाब जल, ताक, चारप्रकारच्या चटण्या, 3 प्रकारचे चाट, 3 प्रकारची लोणची, 3 प्रकारचे दही, सॅलड, पापड आणि चिप्स वाढलेले असतात.
या थाळीच्या मेन कोर्समध्ये व्हेज बिर्याणी, दाल तडका, पनीर मखनी, पनीर बटर मसाला, चना मसाला, मेथी आलू, कोबी, थोरा, कढी, ग्रिल्ड वेजिस, कबाब, 3 प्रकारच्या रोटी वाढल्या जातात.
शहंशाह थाळीत गुलाब जामून आणि गाजराचा हलवाही वाढला जातो. या थाळीला सर्व्ह करणारा व्यक्ती पांढरा पोशाख, ग्लोव्ह्ज आणि राजस्थानी पगडी घातलेला असतो. येथे दोन जण मिळून थाळी सर्व्ह करतात, तिसरा व्यक्ती हातात घंटा वाजवताना दिसून येतो. यातून आता जेवण सुरू करायला हरकत नसल्याचे समजते. इंडिया क्लब दुबईच्या सोशल मीडिया पोस्टनुसार आता ही थाळी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात चार लोक सहजपणे जेवू शकतात.